निमगाव केतकी(प्रतिनिधी-अशोक घोडके): 17 नोव्हेंबर अंबड (जि.जालना) या ठिकाणी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा होणार आहे. या मोर्चास इंदापूर तालुका माळी परिषदेच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी इंदापूर तालुक्यातल्या ओबीसी समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
यावेळी तेली, न्हावी, मुस्लिम, दलित तसेच ओबीसीतल्या इतर जातीच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून 17 तारखेला होणार्या ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चास पाठिंबा दिला. अंबड या ठिकाणी सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान ऍड.कृष्णाजी यादव यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी अंकुश जाधव, शशिकांत शेंडे, किरण म्हेत्रे, अंथुर्णे गावचे अमर बोराटे, निवृत्ती गायकवाड, शेळगावचे राहुल जाधव, श्री.चौवरे, मोहन दुधाळ झगडेवाडीचे अतुल झगडे, निमगाव केतकीचे दत्तात्रेय शेंडे, सरपंच प्रवीण डोंगरे, सचिन देशमाने, संतोष राजगुरू, अण्णा पाटील, ऍड.सचिन राऊत, संतोष गदादे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, तात्यासाहेब वडापुरे, मच्छिंद्र चांदणे, सिकंदर मुलाणी, संजय राऊत व इंदापूर तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले तर आभार प्रवीण डोंगरे यांनी मानले.