बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मतदान काल झाले. 88.48 टक्के मतदार झाले असून, एका मतासाठी 10 हजार, पैशांपेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा असल्याचे प्रतिपादन सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे यांनी व्यक्त केले.
लक्ष्मीचे दर्शन होत नसल्याने दुपारी मतदानाचे प्रमाण कमी होते. दुपारी चारनंतर लक्ष्मीचे दर्शन झाल्याने मतदानासाठी मतदार बाहेर पडले असावेत असे बोलले जात आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 16 हजार 523 मतदारांनी मतदान केले होते. शेवटच्या एका तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर याचे कारण कोणा ज्योतिष्याने सांगण्याची गरज नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे उद्या 24 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.या निवडणुकीसाठी 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होती. मतदानासाठी 67 केंद्रे होती. 19 हजार 549 मतदारांपैकी सुमारे 88.48 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात चौरंगी लढत दिसली. त्यामुळे मतदारांनी कोणाच्या बाजूने कल दिला आहे, हे 24 जून रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
या कारखान्याच्या निवडणुकीसाठी सात गट होते. गट 1- माळेगावसाठी 11 मतदान केंद्रे, गट 2 -पणदरेसाठी 13, गट 3 सांगवी-कांबळेश्वरसाठी 8, गट 4 खांडज-शिरवलीसाठी 7, गट 5 नीरा-वागजसाठी 12, गट 6 ारामतीसाठी 15 मतदान केंद्रे होती. तसेच ब वर्गासाठी एका केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘ब’ गटातून उभे असून, त्यांनी अध्यक्षपदासाठी स्वत:चे नाव घोषित केले. त्यामुळे या निवडणुकीला रंगत आली. या गटात 102 मतदार होते. त्यापैकी 101 मतदारांनी मतदान केले.
गेली 34 वर्षे काम करत आहे. लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निवडण्याचा मतदारांना अधिकार आहे. कारखान्याचा कोण विकास करणार, हे मतदार ठरवतील. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती शाखा रात्री सुरू असताना आमच्या पॅनेलचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. असे ना.अजित पवार यांनी सांगितले.