अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळे आजही लोकांना घास कडू लागत असताना, विद्या प्रतिष्ठानला सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी!

बारामती(प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात अकाली मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत होता व आहे. आजही लोकांमध्ये दादांबद्दलचे प्रेम, आत्मीयता शिस्तप्रिय स्वभाव, विकासपुरूष, कार्यकर्त्यांच्या विशेषतः नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणे, त्यांना मदत करणे, प्रश्न ऐकताच जागेवर प्रश्न सोडविणे, शब्दाला जागणारा विकास पुरूष अशा विविध ओळखीमुळे नागरिक मनातून जोडले गेले होते.

आजही लोकांना घास कडू लागत आहे. कित्येकांचे अश्रूंचा बांध थांबलेला नाही. दादांची प्रत्येक क्षणाला आठवण येत असते. बारामतीचा शनिवार रविवार तर काहींना अंगावर धावून आल्यासारखा वाटतो. काही संस्था व मित्र परिवार त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून काही ना काही सामाजिक कार्य करीत असतात. विशेषतः काही कार्यकर्ते दादा ज्या तारखेला गेले त्या तारखेला उपवास करतात तर काही संस्था त्या दिवशी आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम ठेवतात.

रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्याने त्यावेळी रयतेवर कसे आभाळ कोसळले असेल त्याची प्रचिती दादांच्या जाण्याने बारामतीकरांना अनुभवास मिळत आहे. बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण न पुसणारे आहे. मात्र या समीकरणात छेद निर्माण झाला आणि दोन गटाला नागरिक व कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागले. विद्या प्रतिष्ठान ही एक शैक्षणिक संस्था आहे. खा.शरदचंद्रजी पवार साहेब या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पवार कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या संस्थेचा विश्वस्त व सदस्य आहे.

या शैक्षणिक संस्थेचा प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला फायदा व्हावा म्हणून अजितदादांनी तन-मन व धनाने प्रयत्न केला हे कोणीही नाकारू शकत नाही. एखादी चकाकणारी वस्तु घरात जरी असली तरी त्यास दररोज पुसले नाही तर ती चकाकणार कशी असेच विद्या प्रतिष्ठानला चकाकी आणण्याचे काम अजितदादांनी केले हे त्रीवार सत्य आहे.

अजितदादांसह उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यामध्ये विश्वस्त होते व आहेत. विद्या प्रतिष्ठान म्हणजे पवार कुटुंबाची शैक्षणिक संस्था म्हणून संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात नावलौकीक आहे. अजितदादांना जावून आज वर्षही झाले नाही त्यास आपण सूतक काळ म्हणता येईल तोपर्यंत विद्या प्रतिष्ठान संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या गाजावाजा करून साजरा करण्यात आला. पत्रिका छापण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला इ.सारखे थाटामाटात साजरा होईल असा कार्यक्रम करण्यात आला.

आजही कित्येक दादाप्रेमींनी घरात दादा गेलेपासून नविन वस्तु घेतली नाही किंवा घरातील शुभकार्य पुढे ढकलले जसं की आपल्या घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे पण, विद्या प्रतिष्ठानने एवढा भरगच्च कार्यक्रम करून समाजात काय संदेश दिला हेच कळेनासे झालेले आहे. वर्धापन दिनी झेंडा फडकवून साध्यापणाने साजरा करता आला असता, मात्र सांस्कृतिक मेजवानी ठेवून विद्या प्रतिष्ठान संस्थेला काय दाखवायचे होते. या कृत्यामुळे दादा प्रेमींच्या मनाला ठेस पोहचलेली आहे. दादांसारखा कर्तृत्ववान व्यक्ती कधीही होणे नाही. दादांच्या कार्यशैली, स्वभावामुळे प्रत्येकाच्या मनात दादा घर करून गेले, गळ्यातील ताईत होऊन बसले आहेत. अशात घरच्या लोकांनीच घरच्या व्यक्तीचे दुःखद घटना होऊन वर्ष ही सरले नाही तोपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमासह वर्धापन दिन साजरा करायचा हे कितपत योग्य आहे. काही बुद्धीवान व्यक्ती म्हणतील दादाच्या पोराचं लग्न झाले त्यावेळी दुःखद घटना नव्हती का? वहिनीसाहेबांनी तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली इ. सारखे विषय बोलतील..त्यावर एकच सांगेल आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे याप्रमाणे झाले असेल.

वहिनीसाहेबांनी डोंगरा एवढ्या दुःखावर विर्जन टाकून महाराष्ट्र राज्याच्या विशेषतः बारामतीकरांसाठी खरं तर पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातून दादा पुसले जात नाही तर घरातील पत्नी, मुलांबाबत सांगणे अवघड आहे. आज बारामतीत विविध सण, उत्सव, जयंती साध्यापणाने साजऱ्या करण्यात आल्या. विद्या प्रतिष्ठानने एवढ्या थाटामाटात वर्धापन दिन साजरा करणे गरजेचे नव्हते असेही बोलले जात आहे.

खरं तर दोन राष्ट्रवादी मुळे सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा बुचकळ्यात पडलेले आहेत. खरा राजकीय विरोध आहे का नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!