इंदापूर सारख्या लहान गावात ग्राहकांमध्ये व्यवसायात जम बसविण्यासाठी विश्वास निर्माण केला. उत्तम सेवा आणि प्रभावी प्रचार-प्रसिद्धीच्या आधारावर शहा ब्रदर्स नावाचे गारूड अवघ्या महिलावर्गावर होऊ लागले.
तरूण पिढीला साड्या आणि ड्रेस मटेरियल व्यतिरिक्त वेस्टर्न वेअरचे आकर्षण आहे. सणासमारंभाला ठेवणीतल् या साड्या आणि पंजाबी ड्रेस वापरणार्या नव्या पिढीला जीन्स, टी शर्ट्स आणि अन्य आधुनिक वेस्टर्न वेअर्सच्या भरपूर व्हरायटीज रास्त किंमतीत येथे मिळू शकतात.
भरपूर व उत्तम दर्जेदार माल आणि ग्राहकांच्या पसंतीला उरणारी सेवा या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे आज शहा ब्रदर्स नाव बनले आहे.
एकदा आलेला ग्राहक पुन्हा शहा ब्रदर्स मध्ये येणारच पण त्यांना मिळालेल्या उत्तम ग्राहकसेवेमुळे त्यांनी आपल्या परिचितांना शहा ब्रदर्सची आणि तेथे मिळणार्या उत्तम सेवेची माहिती दिल्याने परिसरातील कानाकोपर्यातून ग्राहक खरेदीसाठी पहिली पसंती शहा ब्रदर्सला मिळत आहे
