बारामती(वार्ताहर): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या संस्थेमार्फत पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत धम्मरथाचे बारामतीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
1 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2023 रोजी निघणार्या या धम्मरथ रॅलीचा प्रवास हा 6 नोव्हेंबर 2023 रोजी बारामती तालुक्यांमध्ये नीरा मार्गे निंबूत या गावांमधून बारामती तालुक्यातील करंजेपूल, मुरूम, वडगाव निंबाळकर, चोपडज, कोर्हाळे, माळेगाव, कर्हावागज, मेडद, या मार्गे बारामती शहरांमध्ये कसबा या ठिकाणी दाखल झाला.

कसब्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे प्रतिभानगर मार्गे सिद्धार्थनगर, बुद्ध विहार, महात्मा फुले नगर, भीमनगर, सुहास नगर, मार्गे चंद्रमणीनगर बुद्ध विहार या ठिकाणी मुक्कामी धम्मरथ आला.
याप्रसंगी बारामती तालुक्यातील व शहरांतील बौद्ध उपासक / उपासिकांनी या धम्म रॅलीमध्ये उपस्थित राहुन धम्म रॅलीचे उत्साह पूर्वक स्वागत केले असल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष पुण्यशिल लोंढे व बारामती शहराध्यक्ष किरण भोसले यांनी सांगितले.