हाजी हैदरभाई सय्यद यांचे दुःखद निधन

बारामतीः येथील मुस्लीम समाजातील ज्येष्ठ हाजी हैदरभाई इस्माईलभाई सय्यद यांचे वयाच्या 85व्या वर्षी शुक्रवार (दि.11) रोजी अल्पशः आजराने राहते घरी निधन झाले. मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांचे वडिल तर बा.न.प.च्या माजी उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम आलताफ सय्यद यांचे सासरे होत.

हैदरभाई यांचा शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाने ते सर्वांचे परिचीत होते. नमाज पठण करणे, मित्रांशी दिलखुलास गप्पा मारणे, उत्तम राहणीमान, मदत करण्याची तळमळ, लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकांची विचारपूस करणे खुशाली विचारणे हा गुण अंतयात्रेत सहभागी झालेले बोलून दाखवीत होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली होती.

माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी विचारांची गरज असते. हैरदभाई यांचे उच्च विचार यापुढेही कुटुंबियांना समाजात वावरताना आदर्श ठरणार आहेत. त्यांनी समाजात वावरताना केलेले पुण्य काम त्या कामाची पावती म्हणून आज मुस्लीम समाजात त्यांच्या दोन्ही मुलांचा म्हणजे महेबुब आणि आलताफ यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकीक आहे व यापुढेही होत राहील.

त्यांच्या पश्चात विवाहीत दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंतयात्रेत सर्वस्तरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!