भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कमळकर

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर येथील साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सदरची नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुर शेख यांनी केली असुन, नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष ऍड.कैलास पठाणे, उपाध्यक्ष ऍड.पांडूरंग ढोरे पाटील, भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ, लिगल विंगचे पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड.समीर बेलदरे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख, सचिव काशिनाथ पिंगळे इ. मान्यवर उपस्थित होते.
बारामती तालुका शाखेचे वतीने तालुक्यातील पत्रकार सदस्यांना संघाचे ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा दरम्यान बारामती तालुक्यातील पश्र्चिम पट्‌ट्यातील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत करंजेचे सरपंच भाऊसो हुंबरे, उपसरपंच सचिन पवार, करंजेपूल (सोमेश्र्वरनगर) च्या सरपंच पुजा गायकवाड, उपसरपंच शेखर गायकवाड, चौधरवाडीचे सरपंच शशिकांत पवार, मगरवाडीच्या सरपंच वनिता हगवणे, मुर्टीच्या सरपंच कोमल जगताप, उपसरपंच किरण जगदाळे, सायंबाचीवाडीचे सरपंच जालिंदर भापकर, उपसरपंच हनुमंत बांदल, वाकीचेचे सरपंच किसन बोडरे, उपसरपंच इंद्रजित जगताप यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाय बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे व्हाईस चेअरमन संतोष शिंदे, तानाजी राजपुरे, सोमेश्र्वर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग कन्हेरे, पो.ह.रमेश नागटिळक हे उपस्थित होते.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सिकंदर नदाफ, तैनुर शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशिल अडागळे यांनी केले. शेवटी आभार बारामती तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!