इंदापूर (प्रतिनिधी अषोक घोडके): एका दिल्लीच्या व्यापा-याने पष्चिम भागातील म्हणजे इंदापूर तालुक्यातील बोरी, बिरंगुडी, शेळगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांना गंडा घातला आहे. याबाबत वालचंदनगर पोलीस स्टेषनला दिल्लीसह स्थानिक व्यापा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अषी की, इंदापूर तालुक्याच्या पष्चिम भागातील बोरी,बिरंगुडी,शेळगाव परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना दिल्लीच्या व्यापार्याने 25लाख 84 हजार 475 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत महावीर गायकवाड (रा. बोरी ) व मोहित कुमार (रा.दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मोहित कुमार स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या मदतीने इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्यांची द्राक्षे विकत घेत होता. त्याने बोरी,बिरगुंडी,शेळगाव परीसरातील दिलीप किसन शिंदे, सचिन लक्ष्मण शिंदे, सोमनाथ रामचंद्र धायगुडे , विजय मुकुंद शिंदे , आप्पा अनिल पाटील, मयुर चंद्रकांत पाटील , शुभम दत्तात्रेय ठोंबरे, गणेश बाळु देवकाते, मल्हारी विष्णु शिंदे , संजय भागवत लेंडे(रा.सर्व जण बोरी) , संतोष मच्छिंद्र भरणे (रा. बिरंगुडवाडी), सतिश जगन्नाथ जाधव, सतिश उत्तम दुधाळ (रा.शेळगाव) तसेच सचिन सुभाष कुचेकर 98 हजार 500 रुपयांचे कॅरेट, सुनिल पाटोळे ,27 हजार रुपयांचे कॅरेट, दत्तात्रेय शिंदे , गणेश ज्ञानदेव कचरे, एकनाथ उत्तम महानवर, अनिल रामचंद्र ठोंबरे यांचे 64 हजार रुपयांचे वाहतुकीचे पैसे ठेवून पळ काढला असल्याची घटना घडली.
वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी तातडीने तपासासाठी पोलिस पथके दिल्लीला पाठवले आहेत.