विद्या प्रतिष्ठानच्या 10 विद्यार्थ्यांची थॉटपॅड इन्फोटेकमध्ये निवड!

बारामती(वार्ताहर): येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील नुकत्याच संपन्न झालेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये बीबीए( सी.ए) विभागातील 10 विद्यार्थ्यांची थॉटपॅड इन्फोटेक प्रा. लि. बारामती या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली.

थॉटपॅड इन्फोटेक ही आयटी क्षेत्रात काम करणारी एक नामांकित कंपनी आहे. कंपनीचे सध्या आर्टीफिशील इंटेलिजन्स, आयओटी, सोशल मार्केटिंग अशा विविध विषयांवर काम चालू आहे. 6 जानेवारी 2024 रोजी कंपनीच्या निवड प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये कंपनीने 61 विद्यार्थ्यांची मुलाखत चाचणी परीक्षा घेतली. त्यामधील महाविद्यालयातील रोहित बाळासाहेब खताळ, प्रतीक्षा शिवाजी हेगडे, अजय अर्जुन सुपेकर, विशाखा सुनील देशमुख, शिवराज उदयसिंग सूर्यवंशी, सोनल लहू वाळके, अब्दुल्ला मोहम्मद तांबोळी, पूजा हनुमंत चव्हाण, पल्लवी कचरू शिंदे, प्रियंका कालिदास जाधव या 10 विद्यार्थ्यांची निवड केली. या निवड प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे शुभम वाघ आणि सायली रणवरे हे उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ऍड.अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ऍड.नीलिमा गुजर, डॉ.राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बी.बी.ए.(सी.ए.) विभागप्रमुख प्रा.महेश पवार, प्रा.विशाल शिंदे, प्रा.अनिल काळोखे, प्रा.अक्षय भोसले, प्रा.पूनम गुंजवटे, प्रा.सलमा शेख, प्रा.वैशाली पेंढारकर, प्रा.अक्षय शिंदे, प्रा.कांचन खीरे यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!