राष्ट्र घडणीसाठी युवकांच्या विकासात राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वपूर्ण – राजेंद्र केसकर

इंदापूर(वार्ताहर): विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांंबरोबरच शैक्षणिक जीवनात राष्ट्रीय सेवा योजना सारख्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले व्यक्तिमत्व तसेच शैक्षणिक घडामोडींचा विकास करावा असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन समारंभ दि. 17 जानेवारी 2024 रोजी म्हसोबावाडी येथे उत्साहात पार पडले याप्रसंगी श्री.केसकर बोलत होते.

या कार्यक्रमासाठी आर.टी.ओ. हर्षदा खारतोडे, ऋषिकेश हंगे, म्हसोबाचीवाडीचे सरपंच राजेंद्र राऊत, उपसरपंच रमेश चांदगुडे, गावचे पोलीस पाटील ऍड.तुषार झेंडे पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे केसकर यांनी मोटार वाहन नियमांचे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताना त्याची सुरुवात आणि येणार्‍या यश-अपयश यांना कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले.

यावर्षी श्रमदानाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहेत. यामध्ये ग्रामसफाई, ग्राम सौर सर्वेक्षण,जलसंवर्धन, मूल्यशिक्षण, पर्यावरण संवर्धन व जागृती, जैवतंत्रज्ञानाद्वारे जैव ग्राम शाश्वत विकास इ.अशा विविध उपक्रमांचा सहभाग करून घेतला आहे.

या शिबिरादरम्यान पुणे विद्यापीठ आणि विविध शासकीय अधिकारी, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी इ. मान्यवर हे या शिबिरास सदिच्छा भेट देणार आहेत. या सर्वांबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाधिकारी प्रा. मंगल गावडे यांनी प्रास्ताविक करताना शिबिराची दिनचर्या ही मुलांना समजावून सांगितली.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राज्य ग्राहक संरक्षण संघटनेचे सदस्य ऍड. तुषार झेंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना या शिबिराचे महत्त्व पटवून दिले आणि यातून मिळालेल्या अनुभवाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.

उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष समस्या संस्कार शिबिर उद्घाटन समारंभ यशस्वीपणे पार पडण्यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ऍड.अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ऍड.नीलिमा गुजर, डॉ.राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, प्रा.मंगल गावडे, डॉ. राहुल तोडमल, डॉ. मंगेश कोळपकर, प्रा.राजेंद्र बळवी, प्रा.मेघना देशपांडे, डॉ.राजेश शर्मा, प्रा. नीलिमादेवी, प्रा.सविता साबळे, प्रा. कुंडलिक गवारे डॉ. अमर भोसले, प्रा.दत्ता जगताप, प्रा.गौतम कुदळे, प्रा.भारतीय तावरे, प्रा.सोनाली काटकर, प्रा.विशाल शिंदे, प्रा.कांचन खिरे प्रा.गणेश वाळके, प्रा.सलमा शेख, प्रा.नीता नांदगुडे, प्रा.तृप्ती कदम आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सलमा शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.कांचन खिरे तर आभार प्रा. तृप्ती कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!