बारामती(वार्ताहर): माजी नगराध्यक्ष कै.विनोदकुमार गुजर यांचे चिरंजीव व बारामती वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड.संदीप गुजर यांची नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) बारामती शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अजित पवार गटाने अचानक सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) च्या विविध स्तरावर निवडी सुरू आहेत. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या बारामती शहर अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शेवटी ऍड.गुजर यांना संधी देण्यात आली आहे.

तत्पुर्वी बारामती तालुका अध्यक्षपदी ऍड.एस.एन. जगताप यांना संधी मिळाली आहे. विनोदकुमार गुजर आणि पवार साहेब यांचे घनिष्ठ संबंध व विश्र्वास होता. पवार साहेबांनी दिलेले काम चोख बजावित होते. याच गुजर कुटुंबातील विनोदकुमार गुजर यांचे चिरंजीव संदीप गुजर यांना शहरपदाची जबाबदारी दिली आहे. ते शांत, संयमी स्वभावाचे आहेत. कायद्याबरोबर त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे येणार्या काळात ही जबाबदारी उत्कृष्ठरीत्या पेलतील यात शंका नाही.
त्यांच्या पुढील कार्यास सा.वतन की लकीर तर्फे शुभेच्छा!