वाढत्या महागाईत लोकविकास प्रतिष्ठानचा दिलासा : ना नफा,ना तोटा तत्वावर दिवाळी फराळ उपलब्ध

बारामती(वार्ताहर): महागाईचे संकट दिवाळीच्या सणावर असून वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ना नफा न तोटा या तत्त्वावर शहरातील सर्वसामान्य लोकांना दिवाळीचा फराळ उपलब्ध करून दिला आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी हा उद्देश असून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जय पाटील यांनी केले आहे.

शहरातील आबासाहेब सातव चौक तांदूळवाडी रोड येथे जय पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस आजिनाथ चौधर, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, पत्रकार प्रशांत ननावरे, प्रमोद ठोंबरे, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, उद्योजक सतीश कोकरे, तसेच दिगंबर पाटील, साधू बल्लाळ, आनंद जाधव, मदन मलगुंडे, अतुल कांबळे, अजित पाटील, आशिष तावरे, राहुल मदने, रमेश चांदगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बाजारभावापेक्षा निम्म्या किंमतीत दिवाळीचा फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेकडून देखील या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मोतीचूर लाडू, बेसन लाडू ,रव्याचे लाडू, शंकरपाळी, शेव, चकली शेव, करंजी, गुलाबजाम, डिंक लाडू ,म्हैसूर पाक, बालुशाही, बाकरवडी, काजुकतली तसेच सर्व प्रकारचे चिवडे उपलब्ध आहेत. शहरातील सातव चौकात प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!