बारामती(वार्ताहर): म्हणतात ना, दिवाळीत आर्थिक चटका बसतो मात्र, मटका चालकांची रोजच दिवाळी असते. मटका खेळणारा कधीही आर्थिकने मोठा झालेला नाही पण मटका चालक माडीवर माडी बांधत असतो. तरी सुद्धा खेळणारा मात्र डोळ्यावर पट्टी बांधून पैसे घालवीत असतो.
पानगल्ली येथील एका मटका अड्ड्यावर बारामती शहर पोलीसांनी छापा टाकून चालका विरोधात गुन्हा दाखल केला चांगली गोष्ट आहे. मात्र, या परिसरात इतर मटके अड्डे आहेत ते मोकटापणे सुरू आहे त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. राजरोसपणे अवैध मटका सुरू आहे.

मटका चालकांनी माडीवर माडी, गाडी, लॉकेट घालून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. बारामती शहर पोलीसांनी करडी नजर ठेवत या परिसरातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आर्थिक हितसंबंधातून पोलीस अधिकारी या धंद्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्वसामान्य गरीब वर्ग कंगाल झालेला आहे. व्यसनाधिन झालेला आहे. संसार उघड्यावर पडलेले आहेत. त्यामुळे केवळ मटका चालकांचे हितसंबंध जपण्यासाठी एका विशिष्ट वर्गावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. त्यामुळे येणार्या काळामध्ये प्रशासन या गोष्टीकडे कोणत्या नजरेने पाहते हे पाहणे गरजेचे आहे.