बारामती(वार्ताहर): राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामतीत बौद्ध समाजाचा भव्य मेळावा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्ध समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात, अजय दहाडे व मंजुषा शिंदे यांचा प्रबोधनपर भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.
या मेळाव्याचे आयोजन मा.उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, भाजप प्रदेश सदस्य सचिन साबळे, पं.स.माजी सभापती संजय भोसले, अमोल वाघमारे, निलेश मोरे, अजित कांबळे, सुशांत जगताप, प्रा.मिलिंद कांबळे, देविदास गायकवाड, अक्षय शेलार, नितीन शेलार, गणपत शिंदे, किशोर सोनवणे, श्रीनाथ शेलार, विक्रम थोरात, धीरज भोसले, सागर गायकवाड, सिद्धार्थ सोनवणे, विशाल गायकवाड, संकेत शिंदे, नाना लोंढे यांनी केले होते.
संजय बनसोडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मी आंबेडकर चळवळीतील सामान्य कार्यकर्ता आहे. क्रीडामंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्रामध्ये बौद्ध व मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तळागाळातील गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर काम करा असे सांगितले.
इंदूमिल डॉ.आंबेडकर स्मारक येथे साडेतीनशे फुटाचा डॉ आंबेडकरांचा पुतळा काम 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी अजित पवारांनी मला त्या कामांमध्ये लक्ष घालायला सांगितले आहे, तसा सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर संजय बनसोडे व मी कधीच मंत्री झालो नसतो असे दिलीप कांबळे यांनी बोलताना सांगितले.
पाहुण्यांच्या हस्ते समाजातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व आंबेडकर चळवळीतील योगदानाबद्दल काही व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी समाज बांधवांसोबत खाली बसून भीम गीतांचा आनंद घेतला हे पाहुन समाजबांधव भारावून गेले.
या मेळाव्यास बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, दीपक केदार, मा.ज्येष्ठ नगरसेवक ऍड.सुभाष ढोले, मा.नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, हनुमंत पाटील, माळेगाव कारखान्याचे मा.चेअरमन रंजन तावरे, समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे, भदंन्त हर्षबोधि महाथेरो तानाजी थोरात, मा.ज्येष्ठ नगरसेवक सुधीर सोनवणे, बारामती शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अविनाश बांदल, मा.नगरसेवक रमेश मोरे, अनिकेत मोहिते, राकेश वाल्मिकी, सिद्धार्थ सोनवणे, भास्कर दामोदरे तसेच समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन साबळे यांनी केले आभार अजित कांबळे यांनी मानले.