बारामती(वार्ताहर): आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत गरजूंना पाच लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आदित्य हिंगणे यांनी घेतलेल्या पुढाकारा मुळे 675 नागरीकांनी आयुष्मान भारत कार्डची नोंदणी केली.
स्व.धनंजय देशमुख यांच्या स्मृतींचा उजाळा होत रहावा यासाठी स्व.धनंजय देशमुख ट्रस्टच्या वतीने शहरातील पाटस रोड येथे गेली तीन दिवस कार्ड नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
पाटस रोड परिसरातील अवचट इस्टेट, महादेव मळा, पतंगशाहनगर, देशमुखवस्ती, हिंगणेवस्ती, अनंतआशानगर, समर्थनगर, बनकरवस्ती, सद्गुरुनगर, गायकवाडमळा येथील नागरिकांनी नोंदणी केली.
जयसिंग(बबलु) देशमुख व आदित्य हिंगणे, महात्मा फुले तरुण मंडळ व स्व.धनंजय देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने वर्षभर लोकहिताचे उपक्रम राबविले जातात. ज्यांना मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे अशा नागरीकांनी या कार्डची नोंदणी करण्यात आली असल्याचे श्री.हिंगणे यांनी सांगितले.