बारामती(सा.वतन की लकीर ऑनलाईन): देशाच्या व राज्याच्या राजकारणातील पितामह म्हणून ज्यांना संबोधले जाते ते म्हणजे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब होय. गेली तीन तपापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळी पकड त्यांनी निर्माण केली आहे. त्यांना बहुसंख्य नागरीक साहेब या नावाने संबोधतात. तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधने त्यांच्याशी समन्वय संवाद साधने म्हणजे पवार साहेबांची खरी ताकद होय. कित्येक आमदार, खासदार तसेच विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्यामुळे घडली हे त्रिकाल सत्य आहे ते नाकारून चालणार नाही.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात पवार साहेबांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकविले. आज तेच पंतप्रधान महाराष्ट्र दौर्यावर आले असता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करीत आहेत. राज्यातील मोठे नेते केंद्रात कृषीमंत्री होते, पण त्यांनी शेतीसाठी काय केलं? ज्या पवार साहेबांना उठता-बसता सतत शेतीचा विषय तोंडी असतो हे मोदी साहेब विसरलेले दिसत आहे. मोदी म्हणतात सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकर्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकर्यांना दिले. जर-तर, जेव्हा-तेव्हाचा विषय असतो त्यावेळची परिस्थिती आताची परिस्थितीचा अभ्यास जर मोदी साहेब करीत नसतील तर राजकारणापायी टिकास्त्र करण्याचे कारण काय? आता मतदार/नागरीक दूधखुळी राहिलेली नाही त्यांना माहिती आहे की लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागणार आहे.
ज्याप्रमाणे मोदी साहेब म्हणतात पवार साहेबांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकविले. मात्र, या पक्षातील दोन नंबरचे नेते पक्षातून चालते झाले याबाबत आजही पक्षामध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. नक्की यापुढे झेंडा घ्यायचा कोणाचा हा खूप मोठा ग्रहण प्रश्र्न त्यांच्यासमोर पडलेला आहे.
यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रावर प्रभाव असलेले नेते म्हणून शरद पवार ओळखले जातात. सत्तेत असले किंवा नसले, तरीही महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत राहते हे कोण्या ज्योतिषीने सांगण्याची गरज नाही. या अगोदर पवार साहेबांबद्दल भ्र-शब्द जरी कोणी काढला तरी पक्षातील नेते मंडळी धाव-धाव विरोधकांवर शब्दांचा मारा करीत होती. साहेबांना बोलले तर स्वकीय भर सभेत त्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेत होते. मात्र, महाराष्ट्रात तेही शिर्डीत मोदीसाहेब जर पवार साहेबांनी शेतकर्यांसाठी काय केले असे म्हणत असतील तर स्वकीयांची काय दातखिळी बसली होती का?
पक्ष सोडून जाणे, पक्षात दुफळी पाडणे, गट तयार करणे हे जर खरे नसेल तर नागरीकांची परीक्षा घेतल्यासारखे होत आहे. ज्या मतदार/नागरीकांनी तुम्हाला राजकीय प्रतिष्ठा दिली हेच नागरीक येणार्या काळात तुमची परिक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही.
पवार साहेबांबद्दल सिर्फ एकही मारा… असे म्हणणार्याचे काय झाले. आज देशाचे पंतप्रधान जर पवार साहेबांवर बोलताना घसरत असतील किंवा राजकारण करीत असतील तर त्यावेळी तेथे उठून पवार साहेबांनी कृषिमंत्री असताना ना भूतो..ना भविष्यतो असे काम केले आहे त्यामुळे त्यांच्याबाबत बोलू नका अशी धमक तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे होती परंतु, म्हणतात ना एकदा का गळ्यात पट्टा बांधला की, शेवटपर्यंत त्याचीच चाकरी करावी लागते.