इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): येथील पंचायत समिती या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान एन.एच.एम. कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजना कृषी समिती इंदापूर यांच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन आजपासून सुरू करण्यात आले आहे.
कंत्राटी कर्मचार्यांना वयाची अट शिथिल करून विनाशर्त नियमित रिक्त पदावर समायोजन करून घ्यावे. 2005 पासून आजपर्यंत कामाचा मोबदला म्हणून वाढीव फरक आजपर्यंत मिळालेला नाही, तो तात्काळ मंजूर करावा. शासनाने कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांना त्वरित कायम करून घेण्यात यावे इ. मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजना कृषी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या इशार्यानुसार कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांनी इंदापूर पंचायत समिती यांच्यासमोर आंदोलन केले आहे. यावेळी उपस्थित श्रद्धा पाचणकर, जयश्री वाक्षे, माधवी हाके, रेणुका जाधव, गौरी पवार, उषा दिवेकर, तृप्ती उबाळे, प्रमिला जगताप, माधुरी शिंगाडे, दिपाली घुले, राणी पवार, ललिता पोरे, भारती गायकवाड, पुनम दळवी, संगीता चितारी, नायदा मनेरी, सुनीता जाधव, स्मिता साठे, डॉ.अरविंद आर.किल्ले, स्वाती भोसले, मोनाली घोळवे, सुरेश शिर्के, मनीषा लोणकर, राणी वनवे, अश्विनी लोंढे, रेखा खेकाळे, रिजवाना तांबोळी, बालाजी गडदे, सारीका कोकणे, शितल राऊत इ. उपस्थित होते.