नवदितांना प्रेरणादायी व्यक्तिमत: आलताफभाई….

बारामती(ऑनलाईन-वतन की लकीर): नवदितांना प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व म्हणजे दि मुस्लिम को-ऑप बँकेचे संचालक आलताफभाई सय्यद आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून एक आगळी वेगळी ओळख निर्माण आलताफभाईंनी केली आहे.

पडत्या काळात त्यांनी जे काही केले त्यामागे त्यांची भूमिका खंबीर होती. कष्ट करायला ते कधीही मागे हटले नाही आणि प्रामाणिकपणा सोडला नाही. वेळेचा आदर करत नम्रपणे पुढे चालत राहिले. साहजिकच आंब्याच्या झाडालाच लोकं दगडं मारीत असतात, बाभळीच्या झाडाला कधीही कोण दगडं मारीत नाही कारण त्यापासुन काहीच मिळत नसते. निंदनाचं घर असावे शेजारी अशाप्रकारे काही टीकाकार मंडळी आरोप-प्रत्यारोप करीत असतात. त्या टीकाकार मंडळींनी सगळा नव्हे मात्र थोडा तरी आदर्श घ्यावा आणि समाजात काम करावे.

अखंडपणे समाजातील गोर-गरीब, दु:खी पिडीतांना रमजान सणानिमित्त शिर्रर्खुमा पदार्थ वाटप करीत आले आहेत. अल्पसंख्यांक समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे शैक्षणिक आर्थिक मदत मिळवून दिली आहे. नुकतेच याच महामंडळातर्फे 70 छोटे उद्योग धंदे करणार्‍यांना 3 लाखाचे कर्ज मंजूर करून आणले. प्राथमिक-माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची उभारणी केली. महिलांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था उभारली. युवकांना व्यायामाची सवय लागावी म्हणून व्यायामशाळेची उभारणी केली. सामाजिक, राजकीय क्षेत्रात झपाटलेल्या प्रमाणे काम करणारे, काम मार्गी लागेपर्यंत गप्प न बसणारे आलताफभाई आहेत.

सर्वांना बरोबर घेऊन ते काम करीत आलेले आहेत. आलताफभाईंच्या सुख-दु:खात खांद्याला खांदा लावून पहिल्यापासून काम करणारे आजही त्यांच्या सोबत सावलीप्रमाणे काम करीत आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात ज्याप्रमाणे आलताफभाईंचा वेलू गगनभरारी घेत आहे त्याचप्रमाणे त्यांना साथ देणार्‍यांचा सुद्धा वेलू गगनभरारी घेत रहावा अशी मनोमन इच्छा त्यांची असते आणि त्याच उद्देशाने ते समाजात काम करीत आलेले आहेत.

कोणतेही काम करीत असताना ते सतत इव्हरग्रीन असतात. कामातील सातत्य, उत्साह आणि नवीन शिकण्याची तयारी त्यांच्यामध्ये असते. आजपर्यंत ते नेहमी स्वत:चा व इतरांचा आदर करीत आलेले आहेत. विनम्र राहुन सकारात्मक राहत आलेले आहेत. समाजासाठी झिजत आलेले आहेत या त्यांच्या कार्याचा सुगंध प्रसिद्धी न करता आपोआप दाहीदिशेला दरवळत आहे. मित्रमंडळींचे ते मन:पूर्वक व उदारमताने कौतुक करतात. त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत त्यांनी ज्ञान, मान व दान करीत आलेले आहेत त्यामुळे नवदितांना प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व म्हणजे आलताफभाई म्हटलं तर वावगे ठरू नये.

आज या सर्व कार्यात त्यांची पत्नी माजी उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सभापती मामा कमरूद्दीन सय्यद, मामेभाऊ सहारा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवेज सय्यद व त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या सुरूवातीपासुन साथ मिळालेले मित्र परिवारांची मोलाची साथ लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!