इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सहकार व आरोग्य क्षेत्रातील नवदुर्गांचा सन्मान सोहळा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्रजी केसकर, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, पंचायत समितीचे माजी सभापती महिंद्र रेडके, तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अनिता खरात, इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिता शहा, धरमचंद लोढा, फिल्म इंडस्ट्री मधून कलाकार मिताली कोळी, अपेक्षा पांचाळ, घुंगरू पिक्चर निर्माता बाबा गायकवाड हे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनीषा मखरे, चित्रलेखा ढोले, अमृता भोईटे, इंदू घनवट ,अरुणा कवडे , मनिषा वचे, अंकिता शहा, खैरुनिसा शेख, अनुष्का भरणे, अश्विनी ठोंबरे, जयश्री गटकुळ, राजमाता ग्रुप इत्यादी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
राजेंद्रजी केसकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महिलांनी समाजात निर्भिडपणे राहून काम करण्याचे आवाहन केले. महिला शक्ती खूप काही करू शकते सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत. महिला समाजात सर्व जबाबदारी पार पाडत असतात आणि त्यांचा सन्मान तेजपृथ्वी ग्रूपच्या माध्यमातून करण्यात आले ही खूप मोठी बाब आहे.
या वेळी अनिता खरात, बाबा गायकवाड, अंकिता शहा, मिताली कोळी, अपेक्षा पांचाळ यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले.
सन्मानाला उत्तर देताना चित्रलेखा ढोले, मनीषा मखरे, इंदु घनवट, गटकुळ मॅडम यांनी तेजपृथ्वी ग्रुप व अनिता खरात यांच्या माध्यमातुन नेहमीच महिला-युवकांसाठी वेगवेळे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याचा नक्कीच महिलांना फायदा होतो असे सांगितले व आभार मानले.
कार्यक्रमाला नितीन कदम, नाना नरुटे, वाशिम शेख, सूरज धाईंजे, विकास शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, शुभम पवार, प्रशांत उंबरे, दत्ता पांढरे, संकेत वाघमोडे, सोनु सय्यद, विशाल म्हेत्रे प्रदिप पाटील हे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश शिंगाडे, सद्दाम बागवान, संदीप रेडके, आर.जी. साबळे, विजय पवार, अमानत बागवान यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब खरात यांनी केले तर रेश्मा रेडके यांनी आभार मानले.