दुसरे लग्न केल्याने जन्मदात्या आईनेच मुलाला सोडून दिले!पोलीस व जागरूक नागरीकामुळे आई-मुलगा जवळ आले!!

बारामती(वार्ताहर): आईने दुसरे लग्न केले, दुसर्‍या पतीला आपत्य असल्याचे कळू नये म्हणून आईने बारामती बस स्थानकावर मुलाला सोडून दिल्याची धक्कादायक बाब बारामती शहर पोलीस स्टेशन व जागरूक नागरीक सागर रमेश निगडे (रा.साठेनगर, बारामती) या सतर्कतेमुळे समोर आली.

रमेश निगडे यांना 5 वर्षाचा बिहारचा अल्पवयीन मुलगा बारामती बसस्थानकाच्या परिसरात आढळून आला. त्यास विचारपूस केली असता आई सोडून गेल्याचे सांगितले. रमेश निगडे यांनी तातडीने शहर पोलीस स्टेशन गाठले.

बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांनी तातडीने सुत्र फिरवीत सदर मुलगा परप्रांतीय असल्याने मुलाबरोबर संभाषण करणेस अडचण निर्माण होत होती. या मुलाला विश्वासात घेत विचारपूस केली याने आईचा तोडका मोडका मोबाईल नंबर सांगितला.

या तांत्रिक विश्लेषणाद्वारे घोडके यांनी आईचा शोध सुरू केला. काही वेळातच मुलाची आई नामे सौ.सिनादेवी ऋषीकुमार तिवारी (रा.समुचाल ता.कल्याणपुर जि.मोतीहारी (बिहार) हिस हजर केले. हिची सखोल विचारपूस करता मुलाचे वडील मयत आहेत. तिने दुसरे लग्न केले असून तिचे दुसर्‍या नवर्‍याला या मुलाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. ती काल बारामती येथे तिचे पतीकडे राहणेस आली होती. त्यावेळी तिने सोबत आणलेले अल्पवयीन मुलास बारामती एस.टी. स्टॅन्डवर सोडून दिलेचे सांगितले.

पोलीसांनी नमूद बाईचा पती ऋषीकुमार सुरेश तिवारी यांस पोलीस स्टेशन येथे बोलावून त्याचे व अल्पवयीन मुलाचे आईचे समुपदेशन करुन अल्पवयीन मुलाचा व्यवस्थीत सांभाळ करणेबाबत सांगितल्याने त्यांनी त्यास तयारी दाखविली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस अंमलदार अभिजित कांबळे, आबासाहेब चौधर यांनी केलेली आहे.

पोलीस व जागरूक नागरीकाच्या सतर्कतेमुळे नागरीकांत कौतुक होत आहे.

आवाहन….
परप्रांतिय कामगार कामावर ठेवताना त्या कामगाराचे नांव, पत्ता, आधारकार्ड इ.परिपुर्ण माहिती घेवून ती वेळीच बारामती शहर पोलीस स्टेशनला देणेत यावी. – पो.नि., दिनेश तायडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!