बारामती(वार्ताहर): प्रत्येक महाविद्यालयात गॅदरिंग सेक्रेटरी पदांसाठी निवडणूका घेतल्या जातात. या निवडणूका स्थानिक विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्र्न निर्माण करणारा असतो. मात्र, अशा निवडणूकीत बारामतीचा अभिषेक निलेश गोंजारी गॅदरिंग सेक्रेटरी झाला.
भिषेकने एम.ई.एस. हायस्कुल याठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. बारामतीच्या महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कमर्शियल आर्ट शिक्षण घेण्यासाठी त्याने सीईटी परीक्षा दिली त्यामध्ये तो महाराष्ट्रात तिसरा आला.
त्यास कॉलेज ऑफ विवा इन्स्टीट्यूट ऑफ बीएफए अप्लाईड आर्टस् मुंबई येथे प्रवेश मिळाला. प्रथमवर्षी शिक्षण घेत असताना प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. द्वितीय वर्षात मुंबई विद्यापिठामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर तिसर्या वर्षी कॉलेजचा गॅदरिंग सेक्रेटरी (जीएस) च्या निवडणूकीत भाग घेत 250 मताने निवडून आला.
या त्याच्या यशाचे बारामतीसह सर्वत्र कौतुक होत आहे. अभिषेकचे वडिल निलेश व आई गेली 25 ते 30 वर्षापासून डॉ.राजे यांच्याकडे इमाने इतबारे रूग्णांची सेवा करीत आले आहेत. पवार साहेबांमुळे बारामती राजकीय पंढरी म्हणून ओळखली जाते. अभिषेकने शैक्षणिक निवडूक जिंकून राजकीय पंढरीला उजाळा दिला आहे.