बारामती(वार्ताहर): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम फेज चारबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे विविध मागण्यांचे निवेदन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले.
या निवेदनात स्टेडियमधील बा.न.प.मालकीचे बंद अवस्थेतील गाळ्यांची डागडुजी, रंगरंगोटी विद्युतव्यवस्था आदी करून सदरील गाळ्यांचे फेरलीलाव करण्यात यावेत आणि गाळ्यांची अनामत रक्कम आणि भाडे मागील लिलावाच्या तुलनेने कमी करण्यात यावे.
या लिलावामध्ये शहरातील अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांना विशेष प्राधान्य देण्यात यावे अशा स्वरूपाचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे यांच्या माध्यमातून नगरपरिषद व उपविभागीय अधिकारी, बारामती यांना देण्यात आले.
निवेदन देते समयी पश्र्चिम महाराष्ट उपाध्यक्ष सुनील शिंदे, तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, तालुका उपाध्यक्ष सुरेश भोसले इ.उपस्थित होते.