बारामती(वार्ताहर): बारामती व्यापारी महासंघ अध्यक्षपदी सुशील सोमाणी तर कार्याध्यक्षपदी जगदीश पंजाबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकतीच बारामती व्यापारी महासंघाचे संस्थापक नरेंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सुभाष सोमाणी, बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांच्यासह व्यापारी महासंघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
व्यापारी महासंघांची नवीन कार्यकारणी संस्थापक नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष सुशील सोमाणी, कार्याध्यक्ष जगदीश पंजाबी, उपाध्यक्ष शैलेश साळुंके, संतोष पानाचंद टाटीया, सचिव स्वप्निल सुरेंद्र मुथा, सहसचिव प्रशांत चांदगुडे, खजिनदार शब्बीर बोहरी, सह खजिनदार महेश ओसवाल, संचालकपदी संभाजी किर्वे, श्याम तिवाटणे, अतुल गांधी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, सुधीर वाडेकर, पंडित भागवत यांची निवड करण्यात आली आहे. तर सल्लागार म्हणून सुरेंद्र मुथा, फकरूद्दीन बोहरी, किशोर सराफ हे काम पाहतील.
व्यापारी महासंघाच्या माध्यमातून व्यापार्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबावण्यावर आपला भर राहील, असे अध्यक्ष सुशील सोमाणी यांनी यावेळी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि कार्यकारिणीचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुशिल सोमाणी, जगदीश पंजाबी, शैलेश साळुंके, संतोष टाटीया व स्वप्निल मुथा यांनी व्यापार्यांच्या व्यथा, अडी-अडचणी खुप जवळून पाहिलेल्या आहेत व त्या वेळप्रसंगी सोडविण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. नविन कार्यकारणीत अशा व्यापार्यांची जान असणार्यांची निवड झालेबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.