बारामती(वार्ताहर): येथील सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटविणार्या नटराज नाट्य कला मंडळाचा 44 वा वर्धापन दिन महाराष्ट्रातील पारंपारीक लोककलावंतांचा सन्मान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पारंपारीक कलेत 64 कला येतात. यामध्ये बारामतीत वासुदेव, पिंगळा, वाघ्या-मुरूली, लावणी कलाकार, सनई वादक, पोतराज, गोंधळी अशा कलाकारांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी या कलाकारांनी आपली कला प्रदर्शीत केली. नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी सर्व कलाकारांचा सन्मान करीत त्यांना प्रशस्तिपत्रक दिले. जेणे करून भविष्यात त्यांना शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून मानधन मिळण्यास मदत होईल.

याप्रसंगी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रातील तमाम नागरीकांनी उपस्थित राहुन शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी सर्व नटराज सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.