आमराई शब्द उच्चारला की काहींच्या कपाळावर आट्या पडतात. याठिकाणी राहणार्या लोकांकडे काहींचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. परंतु, याच आमराईत मानवता, बंधुता, दया, सौजन्य, परोपकार या मूल्यांचे आचरण होते. येथील लोकांची उच्च राहणीमानाबरोबर उच्च विचार अंगीकारले आहेत वैचारिक क्रांती निर्माण झालेली आहे ते एका प्रसंगावरून कपाळावर आट्या पडणार्यांचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल..
दि.4 ऑक्टोबर रोजी दु.3 च्या दरम्यान एक सुशिक्षित महिला (एका शैक्षणिक संस्थेच्या ट्रस्टी) पी.डी.सी.सी.बँकेसमोरून जात असताना त्यांच्या दुचाकी वाहनातील इंधन संपले. वाहन हाकत त्यांनी बँकेच्या वळणापर्यंत आणले. सदरचा प्रकार त्याठिकाणाहून जाताना काही तरूणांनी पाहिला. हे तरूण काय झाले मॅडम असा शब्द उच्चारताच त्या महिलेला धीर आला तिने सांगितले पेट्रोल संपले आहे. या तरूणांनी कोणताही विचार न करता पैसे द्या पेट्रोल आणून देतो. या महिलेने तातडीने पैसे काढले या तरूणांच्या हाती दिले. काही क्षणात या मुलांनी बाटलीत पेट्रोल आणले या महिलेच्या वाहनात भरले आणि वाहन सुरू करून वळवून सदर महिलेच्या हाती दिले. हे पाहुन सदरच्या महिलेने काही रक्कम या तरूणांना देण्यासाठी पुढे केले. मात्र, या तरूणांनी पैसे नको, हे सामाजिक काम आहे असे म्हणून पुन्हा हे तरूण दुचाकीवर बसून सुसाट पुढे गेले. याच महिलेच्या मनात या तरूणांबाबत वेगळा विचार आला असता तर या महिलेने बोलणे तर दूर त्यांच्याकडे पाहिले सुद्धा नसते.
यावरून आजही समाजात माणुसकी जिवंत आहे. तिही आमराई सारख्या भागात त्यामुळे आमराईकडे बघण्याचा विचार बदला तुमचे व समोरच्याचे आयुष्य बदलेल. मी स्वत: हा प्रकार पाहिला या तरूणांना नाव विचारण्या आधीच या मुलांनी (दुचाकी क्र: एमएच-42 एझेड 7014) धूम ठोकली.
- संपादक, तैनुर शेख