बारामती(वार्ताहर): क्रिकेट क्षेत्रात संघ मालकांमुळेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच यादगार बारामती कप 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा भव्य शुभारंभ सोहळा, चषकाचा अनावरण व संघमालकांचा सत्कार समारंभा प्रसंगी श्री.होळकर बोलत होते.
दि.10 ऑक्टोबर रोजी सायं.5 वा. न्यू धनाई अक्षता मंगल कार्यालय जुना मोरगाव रोड बारामती याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक अमजद बागवान, सामाजिक कार्यकर्ते राकेश वाल्मिकी, मुन्ना बागवान, सहयोगी प्रायोजक के ग्रुप प्रतिष्ठानचे विशाल काळे, युवराज काळे, चारदत्त काळे, कुणाल बांदल, प्रतिक जोजारे,पिंटू गायकवाड उपस्थित होते.
आयपीएल देशातील क्रिकेट चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम म्हणजे गाव, तालुका व जिल्हा पातळीवर आयपीएलच्या धर्तीवर स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धेतून ग्रामीण भागातून खेळाडू तयार झाल्याशिवाय राहत नाही व अशा स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचेही होळकर यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजक मोईन बागवान,महंमद शेख, अक्षय कांबळे, सत्यजीत देवकाते व फुल ऍण्ड फायनल आणि युवा क्रांती जनकल्याण संघटना यांनी केले आहे.
या स्पर्धेत खेळाडूंची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने दि.10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेतील चषकाची मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकास अभिवादन करून संघ मालकांच्या दारी म्हणजे सांगवी-शिरष्णे-पणदरे-सोमेश्र्वरनगर-मोरगाव-शिर्सुफळ-गोजुबावी-वंजारवाडी-जळोची-काटेवाडीहून बारामतीत ठिकठिकाणी या चषकाचे स्वागत करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत ओम वॉरीअर्स (सोमेश्र्वरनगर), सुपर स्ट्रइकर्स (जळोची), कबस हिटर्स (बारामती), मोरया 11 फाइटर्स, केजीएफ किंग (बारामती), सागवी लॉयन्स, अल्टीमेट 11 बारामती, क्षत्रिय ट्रॅकर्स (बारामती), मयुरेश 11 (मोरगाव), यूआरडी चॅलेंजर, पीएनसीसी रॉयल्स (बारामती), के ग्रुप प्रतिष्ठान, डीव्ही चॅम्पियन्स्, मातोश्री 11 (पणदरे), शंभू पॉवर्स 11 (गोजुबावी), काटेवाडी टायगर्स, वंजारवाडी ब्लास्टर्स, चव्हाण बिगीनर्स, बीजेएमबी टायगर्स, एसएससीपी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान कसबा (बारामती) या संघाने सहभाग नोंदविलेला आहे.
याप्रसंगी वरील संघ मालक अनुक्रमे किरण शेंडकर- जितू सकुंडे, दादासाहेब दांगडे, सुरज ओवाळ-जमीर महत, अभिजीत काळे-शंकर आटोळे व दत्ता भाऊ लोखंडे, अमोल तावरे-वैभव पोंदकुले व शेखर तावरे, नितीन शेंडे, सुमित यादव, संदीप जाधव, निलेश ढोले, उत्तम धोत्रे, राजू पाचर्णे, निखिल मुळीक व जयंत येलपले, विशाल काळे- युवराज काळे, धनंजय आटोळे–वैभव आटोळे, धीरज गायकवाड -नितीन आल्हाट, अमोलराजे प्रभुणे-गणेश जगताप, अमीर मुलाणी-धनंजय काळे, विजय चौधर-स्वप्नील चौधर, अभिजीत काळंगे-अतुल चव्हाण व हेमंत पवार, भूषण जगताप-विवेक कोकरे व मंथन भापकर, स्वप्नील कदम-रोहित साळुंके या संघमालकांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पाहुण्यांच्या शुभहस्ते स्पर्धेतील खेळाडूंना देण्यात येणार्या टी-शर्टचे अनावर करण्यात आले. सदरचे टी-शर्ट स्पर्धेचे ब्रँड अम्बेंसिडर निलेश लोणकर (मेडद), आकाश काळे (जळोची), संतोष लष्कर (कर्हावागज),सागर मोतीकर (बारामती) व अक्षय तावरे (मोरगाव) यांना परिधान करण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वर जगताप यांनी केले.