इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा निवड चाचणीची कुस्ती स्पर्धा निमगाव केतकी याठिकाणी व्हावी अशी मागणी इंदापूर बाजार समितीचे संचालक तुषार(बाबा) जाधव यांनी केली त्या मान्यतेस कुस्तीगीर संघ इंदापूर तालुका यांनी हिरवा कंदील दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद च्या मान्यतेने धाराशिव या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहेत. 10 ऑक्टोबरला इंदापूर येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जाधव यांची मागणीला कुस्तीगीर संघ इंदापूर तालुका यांनी मान्यता दिली आहे.
यामध्ये शुक्रवार दि.13 ऑक्टोबर रोजी श्री संत सावतामाळी कार्यालय निमगाव केतकी या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून निवड चाचणीस सुरुवात होणार असल्याची माहिती तुषार(बाबा) जाधव यांनी दिली.
यावेळी उपस्थित कुस्तीगीर संघ इंदापूर अध्यक्ष पैलवान अशोक चोरमले, उपाध्यक्ष वस्ताद सचिन बनकर, पै.अस्लम मुलाणी, सदस्य कुंडलिक कचरे, संतोष पिसाळ, हनुमंत रेडके यावेळी उपस्थित होते.