इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): दगडू दादा बनसोडे विद्यालयामध्ये शिक्षक-पालक सभा अतिशय खेळीमेळीत व प्रसन्नमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी शिक्षक-पालक सभेच्या अध्यक्षपदी सुरेश ननवरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या भौतिक, शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी व शालेय कामकाजामध्ये पालकांचा सक्रीय सहभाग व सहयोग वाढवण्यासाठी शासन निर्णयान्वये प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना केली जाते याचाच एक भाग म्हणून शनिवार दि.7 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षक मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे घटक संच चाचणी मधील गुणांची पालकांना प्रगती दाखविली तसेच शैक्षणिक दर्जाचा आढावा मीटिंगमध्ये घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक यांच्या उपस्थिती पालकांचे स्वागत केले. प्रत्येक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे असे अनमोल असे मार्गदर्शन केले. या मिटींगचे औचित्य साधून शालेय व्यवस्थापन समिती स्थापन केली.
या समितीच्या अध्यक्षपदी सुरेश मल्हारी ननवरे, उपाध्यक्ष संतोष विष्णू धुमाळ नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी महिला तक्रार निवारण समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी उषा महावीर भापकर तर उपाध्यक्ष म्हणून स्वाती शंकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व पालक महिला उपस्थिती होत्या.
यावेळी मुख्याध्यापक गिरीशदादा फुले, सुहास जाधव, आयुबखान मुलाणी, दादासाहेब मोरे, कानिफनाथ नाळे, अशोक बनसोडे, सौ.मनीषा सूर्यवंशी, सौ.सई राऊत उपस्थित होते. दादासाहेब मोरे यांनी सूत्रसंचालन करून शेवटी सर्वांचे आभार मानले.