इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): शिक्षकांनी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान आत्मसात करायला हवे असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर पंचायत समिती येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी ई लर्निंग स्टुडिओचे उद्घाटन आमदार भरणे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, विशाल मारकड, संदेश देवकर यासह पालक व शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पुढे बोलताना भरणे म्हणाले की, शिक्षकांनी काळानुसार अपडेट राहणे गरजेचे आहे. शाळांना लागणार्या सर्व माहिती-तंत्रज्ञान सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच संस्कारी बनवले जाते, यासाठी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण दर्जेदार आहे. मुलांनी आई-वडिलांची ही सेवा करा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.