विद्या प्रतिष्ठानमध्ये क्विकहिल फाउंडेशन तर्फे ’सायबर सुरक्षा अभियान संपन्न!

विद्यानगरी(वार्ताहर): येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि क्विकहिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बी.बी.ए.(सी.ए.), बी.सी.ए (सायन्स) व बी. एससी. (संगणक शास्त्र) या विभागातील विद्यार्थ्यांची सायबर जागृती मोहिमेसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना सायबर जागृती हे अभियान राबविण्यासाठी कमवा व शिका योजनेसारखे मानधन कंपनी मार्फत मिळणार आहे.

या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना प्रथम क्विकहिल फाउंडेशनकडून ’सायबर सुरक्षा’ विषयी प्रशिक्षण दिले गेले. यांनतर निवड प्रक्रियेतून निवडलेले विद्यार्थी हे इतर शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन सायबर जागृती मोहीम राबवणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली. या निवड प्रक्रियेसाठी क्विकहिल फाउंडेशनचे समन्वयक, श्री. धनंजय जाचक आणि सौ.गायत्री पवार हे उपस्थित होते.

सदर प्रकियेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते यामधून विद्यार्थ्यांची सायबर वॉरीयर म्हणून निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे व उपप्राचार्य डॉ शामराव घाडगे, डॉ लालासाहेब काशीद, बी.बी.ए.(सी.ए.) विभागप्रमुख, प्रा.महेश पवार, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.गजानन जोशी यांनी अभिनंदन केले.

सदर निवड प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयीन समन्वयक प्रा.सलमा शेख, विद्यार्थी प्रतिनिधी, साहिल शेख, प्रा. विशाल शिंदे, प्रा.अनिल काळोखे, प्रा.कांचन खीरे, प्रा.अक्षय शिंदे, प्रा.पुनम गुंजवटे, प्रा.अक्षय भोसले, प्रा.वैशाली पेंढारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!