विद्यानगरी(वार्ताहर): विद्या प्रतिष्ठानचे, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि स्पोकन ट्युटोरइल आय आय टी बॉम्बे यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला.
या करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे आणि स्पोकन ट्युटोरइल आय.आय.टी. बॉम्बेचे राष्ट्रीय समन्वयक आकांक्षा सैनी यांनी स्वाक्षरी केली. स्पोकन ट्युटोरइल आय आय टी बॉम्बे हे विविध सॉफ्टवेअर आणि प्रौद्योगिकीच्या क्षेत्रातील कौशल्य आणि माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार केले आहे. याद्वारे विविध सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी लागणारे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी लागणार्या प्रोग्रामिंग भाषेचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना संगणकीय भाषेचा वापर करून अद्यावत संगणकीय उपकरणे कसे बनवावे हे शिकवले जाते. यामुळे विद्यार्थांना त्यांच्या भविष्यातील नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न दोन्ही संस्था मार्फत केला जाणार आहे.
हा सामंजस्य करार पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, स्पोकन ट्युटोरइल आय.आय.टी. बॉम्बे महाराष्ट राज्याच्या समन्वयक सौ. विद्या कदम, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे व डॉ. लालासाहेब काशीद, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, बी.बी.ए.(सी.ए.) विभागप्रमुख महेश पवार, आय. क्यू ए.सी. समन्वयक नीलिमा पेंढारकर यांचे सहकार्य लाभले. या कोर्सचे समन्वयक म्हणून अनिल काळोखे काम पाहणार आहेत. सदर करार यशस्वी होण्यासाठी गौतम कुदळे, विशाल शिंदे, कांचन खिरे, अक्षय शिंदे, अक्षय भोसले, पूनम गुंजवटे, सलमा शेख, वैशाली पेंढारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.