इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): माहिती अधिकार कायदा-2005 (आरटीआय) या कायद्याचा उपयोग लोकहितासाठी करण्यात यावा असे मत आरटीआय व सामाजिक कार्यकर्ते वैभव धाईंजे यांनी व्यक्त केले.
28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिवस वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन करताना धाईंजे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माहितीचा अधिकार कायदा हा किती व्यापक आणि लोकांना त्यांचे हक्क कशाप्रकारे मिळवून देतो. भारतीय संविधानाने भारत देशातील सर्व नागरिकांना हा अधिकार दिला आहे. या कायद्यांतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयातून माहिती घेऊ शकतो. प्रत्येक शासनाच्या कार्यालयात काम कसे चालते, कोणत्या योजना आहेत. जनतेसाठी शासनाकडून आलेले अनुदान, निधी कुठे व कसा खर्च झाला इ.बाबत माहितीची मागणी करता येते. कायदा स्थापन कसा झाला व स्थापन होण्यापूर्वीची परिस्थिती मांडली.
माहिती अधिकार कायदा लोकहितासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो यावर आपले मत सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी सविस्तर मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पोलीस नाईक सतिश फुलारे यांनी मानले.