बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांना कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जुन्नर येथे शिवनेरीच्या पायथ्याशी 52 गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे पुणे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध करण्यासाठी निरनिराळ्या सृजनात्मक उपक्रमाद्वारे शाळा व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी केलेले उल्लेखनिय कार्य पाहून यावर्षीच्या गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी मएसो विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांची निवड करण्यात आली होती .
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे नियामक मंडळाचे व शाला समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे , विद्यालयाचे महामात्र डॉ.गोविंद कुलकर्णी, उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, सल्लागार समितीचे सदस्य राजीवजी देशपांडे, फणेंद्र गुजर तसेच पर्यवेक्षक राजाराम गावडे, शेखर जाधव, चंदू गवळे, शिक्षकवृंद, पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.