बारामती(वार्ताहर): म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छताबाबत जनजागृती केली.
2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेपासून स्वच्छतेबाबत फलक हातात घेत, घोषणा देत जनजागृती करीत मोहिमेच्या प्रभात फेरीस सुरुवात केली. शालेय परिसरातील कचरा साफ केला. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून श्रमदान केले. मोठ्या गटातील मुलांनी दांडी यात्रा प्रसंग सादरीकरण केले व फेरीत सहभागी झाले. स्वच्छता ही सेवा या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली या स्वच्छता मोहिमेत सर्वच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागातून श्रमदान व शालेय परिसर स्वच्छता करण्यात आला. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत श्रमाचे महत्त्व पटवून दिले या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.