बारामती(वार्ताहर): येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे निमित्ताने रविवार दि.8 ऑक्टोबर 2023 रोजी बारामती ज्येष्ठ नागरिक संघामार्फत सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ नागरिक संघात सत्कार समारंभ आयोजित केला असल्याचे संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या कार्यक्रमास सोन्या-चांदीचे सुप्रसिद्ध व्यापारी किशोर जिनदत्त शहा सराफ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. वय वर्षे 80 असणार्या ज्येष्ठांचे हे सत्कार व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होणार आहे. तरी जेष्ठांनी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.