बारामती(वार्ताहर): अजिजभैय्या शेख मित्र परिवार यांच्यावतीने बारामतीत भव्य एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्याचा विकीआण्णा यांनी प्रथम क्रमांकाचे 7 हजाराचे पारितोषिक व चषक पटकाविला.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी ज्येष्ठ नगरसेवक सुधीर सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुर शेख, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अजिज शेख, सुजीत जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.

3 ऑक्टोबर 2023 रोजी फायनल खेळवण्यात आल्या त्यामध्ये आठ क्रमांक काढण्यात आले. अनुक्रमे विकीआण्णा (पुणे) 7 हजार, इम्तियाज हुजरे (पुणे) 5 हजार, नकुल काकडे (पुणे) 3 हजार, बापू साळूंके (अकलूज) 2 हजार, भोला सोनवणे (बारामती), जयकुमार (हैदराबाद), रहीम खान (पुणे), आमिर बागवान (बारामती) यांना प्रत्येकी 1 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या नियम व अटीनुसार सावित्रीबाई फुले कार्यालय बारामती याठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या.

आयोजक विशाल सोनवणे, समीर बागवान, भोला सोनवणे, विकास वाडीले, राहुल साबळे यांनी उत्कृष्ठ आयोजन व नियोजन केले होते. बाहेरून आलेल्या खेळाडूंचे निवासाची व भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती.
अजितभैय्या मित्र परिवाराच्या वतीने यश संपादन केलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.