मरहुमा फरजाना मॉं फाऊंडेशनतर्फे इस्लामिक मराठी साहित्य उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

बारामती(वार्ताहर): ह.मोहम्मद(स.) पैगंबर जयंतीनिमित्त मरहुमा फरजाना मॉं फाऊंडेशन, बारामती अध्यक्ष जहीर पठाण व पुणे जिल्हा जमात ए ईस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामिक मराठी साहित्य उपक्रमास बारामती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ह.मोहम्मद(स.) पैगंबर जयंती मिरवणूक मार्गावर इस्लामिक मराठी साहित्य बुक स्टॉल उपलब्ध करून मराठी भाषेतील दिव्य कुरआन तसेच पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषेतील पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी बारामती बँकेचे विद्यमान संचालक शिरीष कुलकर्णी, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहरचे मा.उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे, संभाजी ब्रिगेडचे बारामती शहरचे जेष्ठ सदस्य दिपक भराटे, सामाजिक क्षेत्रातील मंगेश मासाळ, माजी नगरसेवक निलेश इंगुले यांना मराठी भाषेतील इस्लामिक पुस्तके आणि मराठी भाषेतील दिव्य कुरआन अध्ययन करण्यासाठी देण्यात आले.

यावेळी मरहुमा फरजाना मॉं फाऊंडेशनचे अध्यक्ष जहीर पठाण, पुणे जिल्हा जमात ए ईस्लामी हिंदच्या महिला जेष्ठ सदस्या श्रीमती फरजाना सय्यद, मुस्लिम बॅकेचे विद्यमान संचालक आलताफ सय्यद, पत्रकार तैनुर शेख, तांबोळी जमात बारामतीचे अध्यक्ष मुनीर तांबोळी, सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद, राजाभाऊ शेख, एजाज आतार, राजू तांबोळी, नजीर आतार, अजीम अत्तार, अस्लम तांबोळी, अमान पठाण इ.सह मित्रपरिवार उपस्थित होता. बारामती शहर तसेच पंचक्रोशीतील नागरीकांनी या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!