ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी विभागामार्फत ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन बारामतीचे तहसिलदार यांना देण्यात आले.

या निवेदनामध्ये संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करावी. लोकसभा राज्यसभा विधानसभा तसेच विधान परिषदेमध्ये महिला आरक्षणाचा ठराव संमत झाला असून 33 % पैकी 15% आरक्षण हे ओबीसी महिलाकरिता राखीव करण्यात यावे. नॉन क्रिमिनल ची अट संपूर्ण रद्द करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने लागू केलेले कंत्राटी कामगार भरती निर्णय रद्द करण्यात यावा. महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळेचे खाजगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

बारामती तहसिलदार यांना दिलेले निवेदन द्वारा मा.राष्ट्रपती, भारत सरकार राष्ट्रपती भवन नवी दिल्ली यांना देण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर, बारामती युवक कॉंग्रेस अध्यक्ष योगेश महाडिक, बारामती शहर अध्यक्ष ओबीसी विभाग सुरज येवले, पुणे जिल्हा सरचिटणीस सुरज भोसले, बापू आगम इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!