बारामती(वार्ताहर): वकिलांनी पक्षकारांची बाजू मांडताना न्यायालयाचा विश्र्वास संपादन केला पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध उच्च न्यायालयाचे वकील अनिकेत उज्वल निकम यांनी केले.
के.बी.के.असोसिएटस् ऍण्ड लॉ फर्मच्या उद्घाटन प्रसंगी ऍड.निकम बोलत होते. यावेळी जवाहर वाघोलीकर, डॉ.सौरभ मुथा, ऍड.विनोद जावळे, मा.नगरसेवक अभिजीत काळे, डॉ.ऋतुराज काळे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे निकम म्हणाले की, वकीलांनी आपण न्यायालयाचे शिपाई आहोत हे जाणले पाहिजे. न्यायालयात पक्षकारांची प्रामाणिकपणे बाजू मांडल्यास यश नक्की मिळते. वकिलांच्या अंगी संयम असला पाहिजे. एखाद्या पक्षकाराला न्याय मिळण्यासाठी धडपड उज्वल निकम यांच्यासारखी असली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. अनिकेत निकम मिश्कील बोलताना म्हणाले की, 4-5 लोकं सरकार चालवू शकतात तर 4-5 वकिल एकत्र येऊन लॉ फर्म का चालवू शकत नाही. पाऊस सुरू झाल्यावर निकम म्हणाले की, निसर्गाने सुद्धा या उद्घाटनाला साथ दिली आहे. बामतीकरांना पावसात भाषण करण्याची सवय आहे पावसात भाषण झाले की नक्की यश मिळते असेही ते म्हणाले.
यावेळी विनोद जावळे, जवाहर वाघोलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत के.बी.के. असोसिएटस् ऍण्ड लॉ फर्मचे ऍड.वैभव काळे, ऍड.विवेक बेडके, ऍड.रियाज खान, ऍड.बाबाजान शेख, ऍड.महेश पवार यांनी केले. यावेळी बहुसंख्य वकील व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.