बारामती(वार्ताहर): धार्मिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणारे अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे श्रीमंत आबा गणपती महोत्सवात दि.23 सप्टेंबरला सायं.7 वा. सुप्रसिद्ध हिंदी पार्श्र्वगायिका साधना सरगम यांचा संगीत जल्लोष बारामतीकरांना पहावयास मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष वैभव जगताप यांनी कळविले आहे.
दि.19 सप्टेंबरला स.11 वा. सुभाष सोमाणी, श्रीकांत सिकची, ऍड.श्रीनिवास वायकर, ऍड.संदीप गुजर, ऍड.किरण इंगळे व जयसिंग पवार यांच्या शुभहस्ते श्रीगणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 20 सप्टेंबरला श्रीमंत आबा गणपती मंदिरासमोर महल निर्माण केला आहे त्याचे उद्घाटन युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षी मंडळातर्फे वृक्षारोपण करण्याची मोहिम राबविण्यात येते याहीवर्षी सुद्धा 21 सप्टेंबर स.11 वा. फलटण रोड लगत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नागरीकांच्या आरोग्याचा विचार करीत 22 सप्टेंबर स.10 ते सायं.5 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर तांदुळवाडी वेस याठिकाणी ठेवण्यात आले आहे.
दि.24 सप्टेंबरला कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर (झी मराठी फेम) व माधुरी पवार (कलर्स मराठी डान्स शो विजेती) यांचा डान्स जल्लोष. दि.25 सप्टें रोजी कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे दु.1 ते 3 या कालावधीत अभिनेत्री ऋतुजा लिमये यांचे मिसेस बारामती व अभिनेत्री सिया पाटील यांचे सायं. 7 ते 10 पर्यंत होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे.
मुला मुलींच्या अंगी असणार्या गुणांना वाव देण्यासाठी मंडळ सतत पुढाकार घेत आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून दि.26 सप्टेंबर रोजी तांदुळवाडी वेस येथे भव्य रोगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. दि.27 सप्टेंबर रोजी प्रमुख कलाकार भरत जाधव यांचे गाजलेले तू तू मी मी नाटक सायं.7 वा. कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे होणार आहे. गुरूवार दि.28 सप्टेंबर रोजी दु.1 वा. तांदुळवाडी वेस येथुन जनहित प्रतिष्ठान ढोल व ध्वज पथक, म.ए.सो हायस्कुल यांचे ढोल पथक व जयस्तुते ढोल पथक या तीन पथकांच्या वाद्यात श्रीमंत आबा गणपती भव्य विर्सजन मिरवणूक निघणार आहे