बारामती(वार्ताहर): लावणी हा फक्त पुरुषांच्या हक्काचा भाग नाही. महिलांनाही लावणी पाहावयास आवडते. महाराष्ट्रीय संस्कृतीचा भाग म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. महिलांमध्ये लावणी बघण्याची अभिरुची वाढवण्यासाठी बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाने बारामती गणेश फेस्टिव्हल-2023 मध्ये फक्त महिलांसाठी आज 24 सप्टेंबर 2023 रोजी सायं.4.30 वा. कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे नटराज नाट्य कला मंडळाचे संस्थापक किरण गुजर यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमास खास करून बारामती लोकसभेच्या लाडक्या खासदार सौ.सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
लावणी एन्जॉय करीत जगले पाहिजे. लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून तो सर्वसामान्य नृत्यशैलीकडे असतो तसा होणे गरजेचे आहे. पुरुषांपेक्षा महिलांना लावणी पाहावयास आवडते. परंतु महिलांसाठी लावणीचे कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे या गणेश फेस्टिव्हलमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला आहे.
बारामतीच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे काम करणारे नटराज नाट्य कला मंडळ आहे. बारामतीकरांसाठी वेगळं काही करता येईल का? याबाबत सतत प्रयत्न मंडळातर्फे केला जातो.