बारामती(वार्ताहर): अजितदादां साठी काही पण, केव्हा पण व कधी पण अशी वृत्ती ठेवणारे ध्येयवेडे अवलिया माजी नगरसेवक व अजितदादा युवाशक्ती महाराष्ट्राचे अध्यक्ष अभिजीत काळे यांनी चक्क स्वखर्चाने दादांच्या समर्थनात 300 प्रतिज्ञापत्र करून घेतले.
बारामती येथील माजी उपनगराध्यक्ष कै.भिमराव काळे यांची पवार कुटुंबियांवर असणारी एकनिष्ठता प्रेम पाहता, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी नगरसेवक अभिजीत काळे यांनी त्याच प्रेमाखातर कोणतेही पद नसताना, निस्वार्थपणे कै.बाजीराव काळे समाज मंदिरात प्रतिज्ञापत्र करून घेतले. अभिजीत काळे यांनी काळेनगर, चिमणशाहमळा, गायकवाड कॉलनी येथील नागरीकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिज्ञापत्र करून दिले.
या उपक्रमात शैलेश भोसले, ओंकार पवार, नंदू आवटे, मनोज काळे, ऋषिकेश काळे, कुमार भोसले, अजय माने इ. मोलाचे सहकार्य केले.
यापुर्वी अभिजीत काळे यांनी स्वत:च्या रक्ताने दादांना शुभेच्छा दिल्या होत्या एवढं कट्टर प्रेम ते अजितदादांवर करीत आलेले आहेत व करीत राहतील.