इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): एकीकडे पावसाने धिंगाणा घातला तर अनेक ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने पिके धोक्यात आली, गुराढोरांच्या चार्याचा प्रश्र्न ऐरणीवर ठेपला आहे या सर्व पार्श्र्वभूमीवर प्रशासनाने इंदापूर तालुक्यात चारा छावण्यांचे नियोजन करावे असे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका युवकाध्यक्ष आकाश पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. इंदापूर तालुक्यात ही जवळपास हीच परिस्थिती असून,पिके धोक्यात आली आहेत. परिणामी गुराढोरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या रासप चा रस्ता मातीचा असला तरी स्वतःच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा आहे. आगामी काळातील निवडणुकांकरीता राष्ट्रीय समाज पक्ष युवकांची वज्रमूठ बांधून सक्षम पर्याय देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा अशीही मागणी केली आहे.
यावेळी रासपचे इंदापूर युवक आघाडीचे सोन्या जानकर, धनगर समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राज माने पाटील, बहुजन क्रांती सेनेचे अध्यक्ष संतोष आरडे, रासपचे क्रीयाशिल सदस्य सुरज मारकड, विनोद रुपनवर गणेश कोकरे, खंडू सलगर इ. मान्यवर उपस्थित होते.