इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके) असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट (एआयजे) भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी बारामतीचे तैनुर शफिर शेख यांची तर सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे व पुणे विभागीय पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एस.बी. नदाफ यांनी नियुक्तीचे पत्र देवून निवड केली.
संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष एम. एस.शेख यांच्या अनुमतीने तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष लिगल विंगचे ऍड. कैलास पठारे यांच्या शिफारशीने शेख व पिंगळे यांची निवड करण्यात आली. येणार्या काळात जिल्ह्यातील पत्रकारांना संघटीत करून त्यांच्या प्रश्र्नासाठी वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडी प्रसंगी दोघांनी सांगितले.
याप्रसंगी पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे, बारामती तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे, सुशिल अडागळे, महंमद शेख, निखिल नाटकर,सोमनाथ लोणकर, अजय पिसाळ इ. पत्रकार उपस्थित होते.