सुपे(प्रतिनिधी-हाजीमुनीर डफेदार): सुपे ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती शिवाजी वि.का.सेवा सहकारी सोसायटीचे सचिव लक्ष्मण चव्हाण मदतीला धावले.
सुपे गावातील साठेनगर, काळुबाईनगर जमदाडे आदी ठिकाणी पाण्याची होत असलेली अडचण पाहता श्री.चव्हाण यांनी घरोघरी जाऊन गरजवंतांना पाणी वाटप केले. या गावातील 50 ते 60 महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सुपे येथे हंडा मोर्चा काढला होता. या महिलांची अवस्था पाहता लक्ष्मण चव्हाण यांनी स्वखर्चाने व स्वयंस्फूर्तीने पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे. तसेच यापुढेही ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे ताबडतोब पाणीपुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लक्ष्मण चव्हाण यांनी तातडीने केलेल्या मदतीबाबत सर्व गावामध्ये त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.