इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर येथील उमाजी नाईक नगर येथे आद्यक्रांतीगुरु नरवीर राजे उमाजी नाईक यांची 232वी जयंती इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे व कर्मवीर साखर कारखान्याचे व्हा.चेरमन माजी उपनगराध्यक्ष भरत शेठ शहा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, बन्सी बंडलकर, संतोष बंडलकर, भाऊ बंडलकर, भिमा जाधव, आकाश पाटूळे, भाऊ पाटूळे, प्रमोद राऊत, अभिजीत अवघडे, जयंती कमिटीचे अध्यक्ष अभिषेक चव्हाण, उपाध्यक्ष विजय पाटूळे,खजिनदार किरण मंडले,कार्याध्यक्ष निखिल मंडले,सागर सोनवणे,प्रसाद चव्हाण,रितेश बंडलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.