इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): सालाबाद प्रमाणे श्री गोतीमेश्वर यात्रा उत्सव गोतंडी तालुका इंदापूर या ठिकाणी होणार संपन्न शनिवार 2 सप्टेंबर रोजी ह.भ.पा. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम रात्री 8 वाजता मारुती मंदिरासमोर गोतंडी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर रविवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शंभू महादेव छबिना यामध्ये पालखी ची मिरवणूक डिजे व कावडीची ची मिरवणूक होणार आहे. तसेच सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. यामध्ये जवळपास लहान मोठ्या 500 कुस्त्या होणार आहेत. व त्यानंतर संध्याकाळी 9 वाजता मनोरंजन चा कार्यक्रम म्हणून स्वरसंगम आर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
