वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांचे गढीचे व हजरत चॉंदशाहवली दर्गाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश : आ.दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चॉंदशाहवली दर्गा संवर्धन व सुशोभीकरणासर्ंदभातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहे.

मा.राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सह्याद्री शासकीय अतिथी गृहातील बैठकी प्रसंगी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आदेश दिले. या बैठकीसाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.गोविंदराज प्रधान, सचिव पर्यटन श्रीमती राधिका रस्तोगी, व्हीसीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता पुणे आराखड्याची सादरीकरण करण्यात आले.

या आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी या दोन्ही जागेची माहिती व सद्यस्थिती काय आहे व तिथे काय करण्यात येईल तसेच हेरिटेज दर्जा पद्धतीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या तसेच जुन्या काळातील इतिहास नव्या पिढीला कळावा याबाबतची पुरातत्त्व विभागाकडून इतिहासाची माहिती घेऊन त्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना करून आवश्यक निधीची उपलब्धता करण्यात येईल असे आदेश देण्यात आले.
यावेळी इंदापुर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते भारत जामदार, आझाद पठाण, ओंकार साळुंके हे बैठकीप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!