बारामती(वार्ताहर): इतर पद्धतीने कुरआन शरिफ फाडण्याचा निषेध व्यक्त करण्यापेक्षा प्रत्येक घरात जास्तीत जास्त कुरआन शरिफचे वाचन करून निषेध व्यक्त करा असे प्रतिपादन मदिना मशिदीचे मुक्ती सरवत यांनी केले.
कोपरगांव येथील कोळगांव येथे पवित्र कुरआन शरिफ फाडण्याच्या विषयावरून दि.25 ऑगस्ट रोजी मदिना मशिदीत झालेल्या प्रवचनात त्यांनी तमाम मुस्लिम बांधवांना आवाहन करतेवेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, निषेध करण्याचे विविध प्रकार आहेत मात्र, जास्तीत जास्त प्रत्येकाने प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने कुरआन शरिफचे वाचन केल्यास तोही एक प्रकारचा निषेध होईल असेही ते म्हणाले. शांतीचा संदेश देणारा इस्लाम धर्म आहे. जो देवाच्या एकमेवतेला मानतो आणि मानवजातीला ऐक्य शिकवतो. दिव्य कुरआन शरिफ मनुष्य जातीच्या मोक्ष प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे.
ज्या कोणी हे गैरकृत्य केले असेल त्यास त्याची शिक्षा मिळेल. कुरआन शरिफचे वाचन करून त्यावर अंमलबजावणी करा ती कृतीत आणा असेही ते म्हणाले.