इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये 77 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव ऍड.मनोहर चौधरी यांनी ध्वजारोहण केले.
भारतीय लष्कर सेवेत दाखल झालेले स्वप्निल गोफणे आणि विशाल मस्के तसेच पुणे येथील वार्षिक प्रशिक्षण शिबिरात फायरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले एनसीसीचा विध्यार्थी तुकाराम मारकड व व्हॉलीबॉल मध्ये रोप्य पदक मिळालेला विध्यार्थी अजिंक्य गोरे , दीपक सितारे त्याचप्रमाणे एन. सी . सी. चे बी सर्टिफिकेट प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे पोलीस भरती झालेली विद्यार्थिनी ऐश्वर्या गवळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
ऍड.मनोहर चौधरी म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला, बलिदान दिले यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज भारत देश सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे.
यावेळी जेष्ठ नेते अंकुश पाडूळे, डॉ. शिवाजी वीर , डॉ. भीमाजी भोर, डॉ.सदाशिव उंबरदंड प्रा.दिनेश जगताप , प्रा.बापू घोगरे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ आणि डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी केले तर शेवटी आभार उपप्राचार्य प्रा. दतात्रय गोळे यांनी मानले.